कामठी येथील भूषण नगर इथे राहणारी सिद्धी दुबे इचे भारतीय नौदलात फायटर पायलट मनून निवड
भूषण नगर येथील रहिवासी सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर नंदकिशोर दुबे यांची नात सिद्धी हेमंत दुबे या युवतीने लष्करात फायटर पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सिद्धी हेमंत दुबे हिची भारतीय नौदलात फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे. त्या प्रित्यर्थ माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी रविवार (ता.११) रोजी भूषण नगर येरखेडा येथे त्यांच्या निवासस्थानी जावून पुष्पगुच्छ देवून सत्कार केला,व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सिद्धीचे कुटुंबिय आजोबा नंदकिशोर दुबे, वडील हेमंत दुबे, आनंद दुबे यांच्यासह जि प सदस्य मोहन माकडे,भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले,राज्ययोगिनी ब्रम्हकुमारी प्रेमलता दिदी,येरखेड़ा उपसरपंच मंदा महल्ले आणि राजेंद्र चवरे,नारायण नितनवरे, जॉय दत्ता, मुखर्जी, हांडा व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिद्धी नागपूरच्या रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. तिची दोनदा भारतीय सैन्यदलात निवड झाली होती. पण तिने ‘इंडियन नेव्ही एव्हीएशन’ला प्राधान्य दिले. तर सिद्धी च्या परिवारातील वडील हेमंत दुबे भारतीय वायुसेना मध्ये १७ वर्ष सेवा करून निवृत्त झाले असून आजोबा नंदकिशोर दुबे सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर आहेत.