वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी कामठीतील भीसी लाईन, नागसेन नगर इथे नागरिकांना शिकवले सायबर गुन्ह्याचे धडे
आजच्या आधुनिक युगात ऑनलाइन आर्थिक व्यवहार चे प्रमाण वाढले आहेत त्यातच सायबर गुन्ह्यातही वाढ होत आहे तेव्हा सायबर गुन्ह्याची माहिती व्हावी व नागरिकांनी या सायबर गुन्ह्याला बळी न पडो यासाठी जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी कामठीतील भीसी लाईन, नागसेन नगर, मोदी पडाव येथील महिलांना जुनी कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, तसेच सोशल मीडिया सुरक्षा व युवकांमध्ये वाढत चाललेल्या अमली पदार्थाच्या सेवनाविषयी महत्वपूर्ण अशी माहिती दिली व सायबर गुन्ह्याचे धडे शिकवले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वरीष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे तसेच सहायक पोलीस निरीक्षक गडवे यांनी प्रामुख्याने मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन पुष्पराज मेश्राम आभार प्रदर्शन महिला दक्षता समितीच्या सदस्य किरण मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने संध्या खोब्रागडे व वरीष्ठ नागरिक वसंतराव गायकवाड तसेच वनमाला खोब्रागडे, तानाबाई शेंडे, बरखा शेंडे, निधी शेंडे, आस्था वासनिक, सेजल शेंडे, संचिता डोंगरे, छाया उके, सुशीला रंगारी, सुशीला वाघमारे, ओशिन रामटेके, संध्या डोंगरे, ऋचा डोंगरे, शिल्पा रामटेके, विशाखा वासनिक, कोमल रामटेके, सरोज शेंडे, वंदना सूर्यवंशी, मयुरी सूर्यवंशी, गुड्डी रोडगे, दीक्षा सोमकुवर, आचल सोमकुवर, बरखा शेंडे, शमा घरडे, ममता वासनिक, छाया बोरकर, लता हुमने, अंजू सोमकुवर, अंजू घरडे, शारदा रंगारी, आस्था रंगारी, किरण रंगारी, जिजाा बोरकर आदी उपस्थित होते.