कामठी तालुक्यातील कवठा व लोंणखैरी ग्रामपंचायतच्या पोट निवळणुकीचा निकाल जाहीर
काल 18 मे ला संपन्न झालेल्या कामठी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कवठा व लोंणखैरी ग्रामपंचायतच्या प्रत्येकी रिक्त एक जागेसाठी झालेल्या मतदानाची आज 19 मे ला कामठी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मुख्य उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली.
या मतमोजणी निकालानुसार लोंणखैरी ग्रा प च्या प्रभाग क्र 1 च्या रिक्त जागेसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून कविता शेषराज जामगडे यांनी 280 मते मिळवून विजयी झाल्या तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेखा जामगडे यांना 250 मते मिळून पराभूत झाले तर नोटा मतदान 17 झाले तसेच कवठा ग्रा प च्या प्रभाग क्र 1 च्या रिक्त एक जागेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातून विशाल वसंता कापसे यांना 358 मते मिळून विजयी झाले तर कल्पना बारापात्रे यांना 229 मते मिळुन पराभूत झाले तर नोटा ला सहा मते मिळाली.लोणखैरी ग्रा प चा पंचवार्षिक कार्यकाळ 10 फेब्रुवारीला संपणार असून या प्रभागातील तत्कालीन ग्रा प सदस्य उषाबाई अंजनकर ह्या 1 डिसेंबर 2022 ला अकस्मात मरण पावल्याने त्यांच्या रिक्त ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली.
या निवडणूक निकालानुसार प्रभाग क्र 1 च्या रिक्त जागेसाठी कविता जामगडे निवडून आले.तसेच कवठा ग्रा प चा पंचवार्षिक कार्यकाळ हा 29 डिसेंबर 2023 ला संपणार असून कवठा ग्रा प च्या प्रभाग क्र 1 चे सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार उपसरपंच शरद माकडे हे कलम 14(1)(ग)अनव्ये अपात्र झाल्याने त्यांच्या रिक्त ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली.या रिक्त ठिकाणी वसंता कापसे निवडून आले.