खापरखेडा टाउन येथील जुगार अड्ड्यावर खापरडखेडा पोलिसांची धाड
पोलीस स्टेशन खापरखेडा येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदारांमार्फत खबर मिळाली की, खापरखेडा टाऊन परिसरामधील व्हिडीओ गेम पार्लर मध्ये इलेक्ट्रॉनीक मशिनवर लोकांकडुन पैसे घेवुन मनोरंजनाचे नावाखाली मशीन वरील अंकावर पैश्याची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळविला जात आहे.
अशा मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान याची रेड करणेबाबात परवानगी घेवुन पोलीस स्टेशन स्तरावर 07 वेगवेगळे पथक तयार करून 07 वेगवेगळ्या व्हिडीओ गेमपार्लरवर टिम मार्फत रेड केली असता ०७ वेगवेगळ्या व्हिडीओ गेमपार्लर मधुन 88 इलेक्ट्रॉनिक मशिन किमती अंदाजे 17,60,000 रु. नगदी 18080/- रु. व खुर्च्या किंमती अंदाजे ७२००/- रु. असा एकूण 17,85,280/- रूपयाचा मुद्देमाल गुन्हयात जप्त करण्यात आला आहे.
तसेच 26आरोपीतांना ताब्यात घेण्यात येवुन 07 गुन्हे नोंद करण्यात आले आहे.. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण विशाल आनंद (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात आशित कांबळे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक तथा अतिरीक्त कार्यभार कन्हान विभाग, प्रविण मुंडे ठाणेदार खापरखेडा, सहायक पोलीस निरीक्षक दिपक काँक्रेडवार, लक्ष्मी मलकुवार, पोलीस उपनिरीक्षक सुर्यप्रकाश मिश्रा, राजेश पिसे, सहायक फौजदार कैलास पवार, पोलीस हवालदार उमेश ठाकरे, शंकर काकडे, आशिष भुरे, प्रफुल राठोड, विनोद कनोजिया, संजय कासेकर, रंजना नागमोते, पोलीस नायक प्रदिप मने, प्रमोद भोयर, राजु भोयर, मुकेश वाघाडे, दिपक रेवतकर, किशोर येलेकर, बादल गिरी, पोलीस शिपाई शेखर वानखेडे, सदिप वाघमारे, अमित खोब्रागडे, राजकुमार सतुर, शत्रुगन वाहणे, योगेश तितरमारे, शुभांगी घुगल यांनी पार पाडली.