संत जगनाडे महाराज सभागृह वडोदा येथे भव्य मोफत रोगनिदान शिबिराचे करण्यात आले आयोजन
प्रा अवंतिका रमेश लेकुरवाळे यांच्या विशेष प्रयत्नानेआरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर द्वारा काल दि. 29 जानेवारी 2024 ला श्री संत जगनाडे महाराज सभागृह वडोदा येथे भव्य मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 500 हून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री सन्माननीय श्री. सुनिलजी केदार साहेब व मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रसंगी मा.सौ. मुक्ताताई कोकड्डे अध्यक्ष जि.प. नागपूर, मा.कु. कुंदाताई राऊत उपाध्यक्ष जि.प. नागपूर, मा.श्री. सुरेशजी भोयर माजी अध्यक्ष जि.प. नागपूर, मा.सौ. रश्मीताई बर्वे माजी अध्यक्ष जि.प. नागपूर, प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे सभापती म.बा. क. समिती जि.प. नागपूर,
कु. दिशाताई चनकापुरे सभापती पं.स. कामठी, श्री. दिनेशजी ढोले सदस्य जि.प. नागपूर, श्री. नानाभाऊ कंभाले जि.प. नागपूर, श्री. दिलीपजी वंजारी उपसभापती पं.स. कामठी, श्री. आशिषजी मल्लेवार माजी उपसभापती पं.स. कामठी, सौ. सोनूताई कुथे पं.स. कामठी, श्री. ज्ञानेश्वरजी वानखेडे अध्यक्ष काँग्रेस कमिटी मौदा, श्री. राजेंद्रजी लांडे, श्री. संभाजी गावंडे, श्री. राजू थोटे सरपंच वडोदा, श्री. अतुल बाळबुधे सरपंच केम,
श्री. प्रकाश महाकाळकर सरपंच केसोरी, सौ. सोनुताई वासनिक सरपंच नान्हा, श्री. मनोज कुथे सरपंच परसाड, श्री. दत्तू हलमारे उपसरपंच वडोदा, ग्रा.पं. सदस्य पंकज ढोरे, ताराबाई भोयर, छायाताई हलमारे, रमेशजी राऊत, रंगरावजी भोयर, नंदकिशोर खेटमले, चंद्रभान सावरकर,
रुखमंगन वाघ, काशिनाथ खोंडे, सचिन चिकटे, किशोर ठवरे, शिवचरण पिंपलकर, प्रमोद पटले, सुधाकर ठवकर, अर्जुन राऊत, दिनकरजी येंडे, जयपाल काळे, भागवत वाघ, गुड्डू खराबे, शुद्धोधन मानवटकर, ई. मान्यवर उस्थितीत होते.
या शिबिरामध्ये सामान्यरोग तपासणी (जनरल फिजीशियन), स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, कान नाक घसा तपासणी, नेत्ररोग तपासणी, अस्थीरोग तपासणी, कर्करोग (कॅन्सर) तपासणी, दंतरोग तपासणी, हृदयरोग तपासणी ई. आजारांची तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत ५०० पेक्षा अधिक नागरिकांनी तपासणी केली.
तसेच या शिबिराकरीता तालुका आरोग्य अधिकारी राहुल राऊत, डॉ. सबा पठाण, डॉ. विजय बंसोड, डॉ. प्रतिमा विश्वकर्मा, डॉ. दीपिका पुरोहित, डॉ. प्रदीप, डॉ. गौरव बोर्लिकर, डॉ. विशाल सक्सेना, डॉ. बाके मॅडम, डॉ. तेजश्री डहाके, डॉ. सुधीर लाडेकर, ग्रा. पं. सचिव श्री इंगोले व सर्व डॉक्टरांसह संपूर्ण आरोग्य सेवक, नर्स, आशा वर्कर यांनी विशेष योगदान दिले