शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी व प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा या दोन ठिकाणी सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन)केंद्राची स्थापना करण्यात आली
गर्भधारणा उपचारासह प्रसूती,प्रसुतीपश्चात उपचार,बालकाचे लसीकरण एकाच छताखाली व्हावे या अनुषंगाने कामठी तालुक्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी व प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा या दोन ठिकाणी सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन)केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
1मे पासून हे केंद्र कार्यान्वित झाल्याने आता शहर आणि ग्रामीण भागातच गर्भावस्थेतील उपचारासह प्रसूती आणि प्रसूती दरम्यान उपचार व बालकांचे लसीकरण शक्य झाले आहे. त्यामुळे आता एकाच छताखाली गर्भवती महिलांना उपचार व आरोग्य संबंधित विविध समस्यांवर सल्ला मिळणार आहे.या सुमन केंद्रावर गर्भवतींची प्रसूती व प्रसूतिदरम्यान उपचार मोफत पुरवण्यावर भर देण्यात येणार आहे .प्रसूती नंतर सहा महिन्यापर्यंत माता आणि बाळाला सर्वांगीण सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करतील ज्यामुळे निरोगी गर्भधारणा होईल व मातांमृत्यु व बालमृत्यूचेही प्रमाण कमी होईल.