प्रभाग क्र. 15 तील आनंद नगर भागातील अपुरा पाणी पुरवठा होत असून लवकरात लवकर तांत्रिक अड़चन दुर करावी अशी मांगणी माजी नगर सेविका संध्या रायबोले यांनी केली
प्रभाग 15 तील आनंद नगर भागात गत दहा दिवसांपासुन अपुरा पाणी पुरवठा होत असून लवकरात लवकर तांत्रिक अड़चन दुर करून पाणी पुरवठा पुर्ववत करावा अश्या मागणी चे निवेदन माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी नगर परिषद मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना 25 मे रोजी दिले आहे .या पूर्वी सुद्धा मुख्याधिकारी संदीप बोरकर, पाणी पुरवठा अधिकारी अविनाश चौधरी यांना निवेदने दिली,पण अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही पाईपलाईन देखभाल दुरुस्ती करणारा कंत्राटदार न प प्रशासनाला जुमानत नसल्याने ही समस्या ओढावल्याचे माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी स्पष्ट केले.
पाणी टंचाई ने त्रस्त असलेल्या आनंद नगरातील शारदा पंडा, सिता पटले, सत्यभामा वासनिक,चंद्रभागा देशभ्रतार,भारती कनोजे, रक्षा दाभाड़े, वैशाली बडगे,संजय पटले, योगेश नागदेवे,गोपाल नाग,विवेक गजभिये, मनोज बागडे,जियालाल बर्वे, मुन्नालाल खरोले,पांडुरंग रामटेके, महेश गिरी यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
नगर परिषद मुख्याधिकाऱ्यानी कंत्राटदाराला समोर बोलाऊन आवश्यक निर्देश दिले परंतु त्या आदेशाला कंत्राटदाराने कचऱ्याची टोपली दाखवली असा आरोप होत आहे.वाढता उन्हाळा पाहता पाणी समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी त्रस्त महिलां च्या वतीने माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी केली आहे.